काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा काटेरी मुकूट कुणाच्या डोक्यावर ?  

Update: 2019-05-27 09:30 GMT

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत. चार राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे देऊ केलेत. त्यात महाराष्ट्रातून अशोक चव्हाण यांच्याही नावाचा समावेश आहे. मात्र, गेल्या ५ वर्षांत काँग्रेसची झालेली वाताहात पाहता प्रदेशाध्यक्षपदाचा काटेरी मुकूट स्विकारण्यास फारसं कुणीही इच्छुक नसल्याचं दिसतंय

राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यपदाचा संभाव्य नेतृत्वबदल अधांतरी लटकण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची नावे सध्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. मात्र पक्षाची झालेली वाताहत, येत्या ४-५ महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका, त्याच्या तयारीसाठी नव्या प्रदेशाध्यक्षाला मिळणार कालावधी पुरेसा नाही. विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला मोठी गळती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची माळ स्विकारण्यास काँग्रेसमधून फारसं कुणी उत्सुक नसल्याची चर्चा आहे.

Similar News