Fact Check: राहुल गांधींच्या रॅलीत फडकवले पाकिस्तानचे झेंडे?

Update: 2019-04-05 04:55 GMT

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी राहुल यांच्या सोबत मोठ्या संख्येने वायनाडची जनता सहभागी झाली होती. राहुल गांधी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओ वरुन राहुल गांधींसह कॉंग्रेसला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केले जात आहे.

Courtesy : Social Media

राहुल गांधी यांच्या या रॅलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून काही यूजर्सने तर 'राहुल गांधी पाकिस्तानच्या एखाद्या शहरात उमेदवारी अर्ज भरायला गेलेत असं वाटतंय,' असं लिहिलं आहे. तर काही यूजर्सनी हे झेंडे इंडियन यूनियन मुस्लिम लीगचे असल्याचं देखील सांगितले आहे. मात्र, या खोट्या व्हिडीओनं कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

Full View

ते झेंडे पाकिस्तानचे होते का?

राहुल गांधी यांच्या सभेत पाकिस्तानचे झेंडे म्हणून व्हायरल झालेले ते झेंडे पाकिस्तानचे नाहीत. ते झेंडे ‘इंडियन यूनियन मुस्लिम लीग’ या केरळमधील प्रादेशिक पक्षाचे आहे. ‘इंडियन यूनियन मुस्लिम लीग’ वायनाड मतदार संघातील कॉंग्रेसचा सहयोगी पक्ष आहे. दरम्यान या संदर्भात इंडियन युनियन मुस्लीम लीगचे नेते केपीए मजीद यांनी स्पष्टीकरण दिले असून पक्षाच्या स्थापनेपासूनच आमचा हाच झेंडा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तसंच या झेंड्यावर कोणतीच बंदी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

खरे काय?

Website IUML

. ‘इंडियन यूनियन मुस्लिम लीग’ पक्षाचा आणि पाकिस्तानच्या झेड्यांचा रंग फक्त समान आहे. मात्र, यावरील चिन्ह वेगवेगळे आहेत. पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजात हिरव्या रंगावर चांद-तारा आहे. शिवाय बाजूला एक मोठी

पाकिस्तानचा झेंडा

पांढरी पट्टी आहे. तर व्हिडिओतील झेंड्यामध्ये पांढरी पट्टी नाही. शिवाय दोन्ही झेंड्यांमधील चांद-ताऱ्यांची स्थिती वेगवेगळी आहे. त्यावरून हा झेंडा पाकिस्तानचा नसल्याचं स्पष्ट होतंय. मात्र, निवडणूकांच्या तोंडावर मत मिळवण्यासाठी हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

 

राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज.. पाहा हा व्हिडिओ...

Full View

Similar News