पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा गोध्रा हत्याकांडासारखा पूर्वनियोजित कट आहे. असा आरोप गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे.त्याचबरोबर पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेली कार गुजरातची असून त्या कारवरील नंबर प्लेटवर इंग्रजीत GJ असं लिहलं आहे, असा दावा देखील त्यांनी केला.
शंकरसिंह वाघेला यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना भाजपावर आरोप केले. पुलवामा आणि गोध्रा हत्याकांड हे भाजप सरकारचेच षड्यंत्र आहे असं त्यांनी नमूद केले. जर सरकारकडे बालाकोट दहशतवाद्यांच्या तळांविषयी माहिती होती तर त्यांनी आधीच का कारवाई केली नाही असा सवाल उपस्थित करत भाजपवर पुलवामा हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.