सरन्यायाधीश लोढा यांना ऑनलाइन गंडा 

Update: 2019-06-03 08:00 GMT

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आरएम लोढ़ा यांना एक लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. लोढा हे ऑनलाइन स्कॅमचे बळी पडल्याचे समोर आले असून त्यांनी यासंबंधी पोलिसात तक्रार केली आहे. न्यायाधीश लोढा यांनी मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त सायबर गुन्हे शाखेमध्ये तक्रार दाखल केली.

लोढा यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे कि, नेहमीप्रमाणे ते त्यांचे मित्र न्यायाधीश बीपी सिंह यांच्या सोबत इमेलद्वारे संपर्कात होते. १९ एप्रिलला त्यांना न्यायाधीश सिंह यांचा इमेल आला. त्यामध्ये त्यांनी लिहिले होते कि माझ्या भावाच्या उपचारासाठी एक लाखांची आवश्यकता आहे. त्यानंतर मी त्यांना फोन केला मात्र त्यांचा फोन पण लागत नव्हता. त्यानंतर मी त्यांनी दिलेल्या बँक खात्यावर लगेच पैसे पाठवले.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायाधीश बीपी सिंह यांचा इमेल हॅक झाला होता. ३० मेला न्यायाधीश सिंह यांनी स्वतः चा इमेल हॅक झाल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सिंह यांनी या प्रकारची माहिती लगेच न्यायाधीश लोढा यांनी दिल्ली. न्यायाधीश लोढा यांनी त्वरित पोलिसात तक्रार दखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अधिनियमनाच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हॅकरचा शोध सुरु केलाय.

Similar News