चौकीदार चायमुळे रेल्वे अडचणीत

Update: 2019-04-03 03:55 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी भाजपा तर्फे सुरू केलेल्या मैं भी चौकीदार मोहीमेचा प्रसार-प्रचार रेल्वेमध्ये करण्याचा उद्योग रेल्वेला चांगलाच महागात पडणार आहे. निवडणूक आयोगाने या बाबत रेल्वेला नोटीस बजावली असून चार एप्रिल ला निवडणूक आयोग या बाबत अंतिम निर्णय घेणार आहे. मोदी समर्थक स्वयंसेवी संस्था संकल्प च्या माध्यमातून शताब्दी गाडी मध्ये चौकीदार कप मधून चहा देण्याचा उद्योग करण्यात आला होता. या बाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

निवडणूक आयोगाने चौकीदार चहा बाबत नाराजी व्यक्त केल्या नंतर संबंधित कंत्राटदाराला रेल्वेने एक लाख रूपयाचा दंड आकारला असल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे. मात्र यावर निवडणूक आयोगाचं समाधान झालेलं नाही. रेल्वे तिकीटांवर मोदींचा फोटा छापण्याचा उद्योग ही रेल्वे ने या आधी केलेला आहे. ही तिकीटं ही तात्काळ बंद करण्यात आलेली आहेत.

या आधी व्हायब्रंट गुजरातची जाहीरात करणारे बोर्डींग पासेस गो एअर आणि एअर इंडीया ला मागे घ्यावे लागलेले आहेत.

Similar News