मी थेट देशाच्या नवीन पंतप्रधानांशीच चर्चा करेन – ममता बॅनर्जी

Update: 2019-05-07 03:58 GMT

पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांना फानी चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. या वादळात मोठं नुकसानं झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागाचा दौरा केला. त्यानंतर फानी चक्रीवादळासंदर्भात बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहिल्या नव्हत्या. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर चक्रीवादळाच्या परिस्थितीही ममता बॅनर्जी राजकारण करत आहे. असा आरोप केला होता.

दरम्यान केंद्र सरकार बचावासाठी पूर्णपणे सहकार्य करत असून पश्चिम बंगालमधील राजकारणामुळे त्यामध्ये अडथळे येत आहेत. मी स्वतः ममता बॅनर्जी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. मी त्यांच्या फोनची वाट पाहिली. मात्र, त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही असं सांगत मोदींनी ममता बॅनर्जी यांना लक्ष केलं.

https://twitter.com/ANI/status/1125418922264682496

त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.

मी नरेंद्र मोदींना पंतप्रधान मानत नाही, त्यामुळे मी मिटींगला बसले नाही. मला त्यांच्या सोबत एकाच मंचावर यायला आवडणार नाही. मी देशाच्या नवीन पंतप्रधानांशी बोलेल. आम्ही चक्रीवादळाच्या झालेल्या नुकसानीची काळजी घेऊ. आपल्या निवडणुकीच्या काळात सरकारची मदत नको.’

Similar News