गोरक्षक हिंसाचारी मतदारसंघात भाजपा विजयी

Update: 2019-05-24 06:05 GMT

देशातील ज्या भागांतून गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार झाल्याच्या घटना घड़ल्या होत्या. देशातील अशा त्रेसष्ट मतदारसंघात भाजपानं विजय मिळवल्याची आकडेवारी समोर आलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर गोरक्षणाला प्रचंड महत्त्व देण्यात आलं. त्यामुळं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारसह विविध राज्यांत गोरक्षकांच्या टोळ्याच कार्यरत झाल्या. गोरक्षणाच्या नावाखाली अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. मात्र, हा हिंसाचार गोरक्षणासाठी केलेला असल्यामुळं त्याचं आंधळं समर्थन केलं जातंय. तसंच ही बाब समाजात आदराची असल्याचं सांगत अनेक तरूण या गोरक्षक पथकांमध्ये सामील झाल्याचं उघड झालंय. अशाच हिंसाचाराच्या घटना नोंद झालेल्या सुमारे 63 मतदारसंघांमध्ये भाजपानं यावेळी विजय मिळवलाय. गेल्या निवडणूकीत अशा 60 मतदारसंघांमध्ये विजय मिळवला होता.

Similar News