आणि ममता नडली.....

Update: 2019-05-23 14:01 GMT

देशात मोदी आणि भाजपाला विरोध करणा-यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. अगदी आंध्रप्रदेशात चंद्राबाबू नायडू यांचं तर लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणूकांमध्ये पतन झालं. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती भाजपाला चांगली टक्कर देतील अशी अपेक्षा असताना भाजपाला पुन्हा 60 जागा मिळाल्यानं या दोन्ही पक्षाच्या महागठबंधनाला फारसं यश आलं नाही हे सत्य आहे. त्याप्रमाणे एकेकाळचा डाव्यांचा गड असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही तगडं आव्हान दिलं होतं. या राज्यातील 42 जागांपैकी 34 जागांवर गेल्या निवडणूकीत तृणमुल कॉंग्रेसला विजय मिळवता आला होता. त्यानंतर या राज्यावर अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी लक्ष केंद्रीत केलं. शाह यांनी 18 वेळा दौरा केला. लोकसभा निवडणूकांदरम्यान या राज्यात हिंसाचार आणि जाळपोळही झाली. शाह यांच्या 18 दौ-याचं फलित त्यांना मिळालंय त्यांच्या जागा दोन वरून 18 जागांवर पोहोचल्या आहेत. मात्र ममता बॅनर्जी यांना 23 जागावर समाधान मानावं लागलंय. असं असलं तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपासारख्या तगड्या पक्षाला जबरदस्त टक्कर देत रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं ममता बॅनर्जी पडली नाही तर नडली असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

Similar News