महाराष्ट्रात भाजपचे खासदार लाख लाख मतं घेत विजयी झाले. मात्र, प्रस्थापितांना शह देत शिवसेनेच्या बाले किल्ल्यातून वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी कडवी झुंज देत विजय खेचुन आणला. वंचित फॅक्टरमुळे 1998 पासून खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे यांच्या गडाला सुरुंग लागला आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील हे अवघ्या 4,492 मतांनी विजय झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. चंद्रकांत खैरे यांना 3 लाख 84 हजार 550 मतं मिळाली. तर इम्तियाज जलील यांना 3 लाख 89 हजार 042 इतकी मतं मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना 2 लाख 83 हजार 798 मतं मिळाली. हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन झाले. आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा विजय सोपा झाला.
औरंगाबाद (वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला ३ लाखापेक्षा अधिक मत, उमेदवार विजयी)