'ढाई किलो का हाथ' भाजपमध्ये

Update: 2019-04-23 09:32 GMT

बॉलिवूड आणि राजकारण यांचं नातं नवीन नाही. बॉलिवूडमध्ये काम करणारे अभिनेते राजकारणात येऊन नंतर नेते झाले. सध्या देशात लोकसभा निवडणूका सुरु आहेत. त्यातच अनेक बॉलिवूड कलाकारांनी राजकारणात एण्ट्री केली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी नुकताच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना मुंबईतून उमेदवारी देखील मिळाली. त्यातच अभिनेता सनी देओलने आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे सनी देओलला कोणत्या मतदार संघातून उमेदवारी मिळणार? याकडे सर्वोंचे लक्ष लागले आहे.

माझे वडील भाजपच्या परिवारासोबत...

“माझे वडील अनेक वर्ष भाजपच्या परिवारासोबत आहेत. वडील अटल बिहारी वाजपेयींसोबत होते, मी आता मोदींसोबत काम करणार आहे. मोदी पुढील पाच वर्षासाठी भारतात पंतप्रधान म्हणून असावे, त्यामुळे आपला देश आणखी पुढे जाईल. मी जास्त बोलणार नाही पण काम करुन दाखवून देईल”

सनी देओलची सावत्र आई ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनीही भाजपच्या उत्तर प्रदेशातील मथुरेतून खासदार आहेत. मथुरा मतदारसंघातून हेमा मालिनी यंदाही निवडणूक रिंगणात आहे. सनी देओलच्या भाजप प्रवेशावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन, अर्थमंत्री पियुष गोयल उपस्थित होते.

Similar News