लातूरमध्ये दुष्काळाचे तीन बळी

Update: 2019-04-29 13:07 GMT

रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलेल्या लातूर जिल्ह्याचा त्रास काही केल्या कमी होत नाहीये. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील आलमला इथं अरूंद विहीरीत गाळ काढण्यासाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना सोमवारी (दि. २९ एप्रिल) सकाळी ९ च्या सुमारास घडलीय. नेमकी घटना काय ? आलमला इथल्या महेश्वर सदाशिव खिचडे यांच्या मालकीच्या विहीरीतला गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवी म्हणून मुलानी कुटुंबियांतील एक जण विहीरीत उतरला होता. तो परत न आल्यानं दुसरा आणि मग तिसरा विहीरीत उतरला मात्र, तिघंही परत येत नसल्यानं अरूंद असलेल्या विहीरीत इतर ग्रामस्थ उतरले.

गेल्या दोन महिन्यापासून गावात भिषण पाणी टंचाई जाणवत असल्याने खिचडे यांच्या आडात ग्रामपंचायतने मोटार सोडलेली असून गावाची तहाण भागवण्याचा प्रयत्न चालू होता. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये फारुख खुदबोद्दीन मुलानी ( वय ५५), सद्दाम फारुख मुलानी ( वय २५) सय्यद दाऊद मुलानी ( वय २८) यांचा गुदमरून मृत्य झाला. उर्वरित चार जणांना ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत हालर मशीन लावून या विहिरीत हवा सोडली, त्यामुळं विहीरीतील इतरांना ऑक्सिजन मिळाल्यानं त्यांना जिवंत बाहेर काढणं शक्य झालं. यापैकी सुशांत महिशंकर बिराजदार (वय २२), योगेश उमाकांत हुरदळे (वय २२), साहिल कमाल मुलानी व मल्लिनाथ बसवेश्वर आंबूलगे यांच्यावर लातूरच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमधील सद्दाम मुलानी यांचं पंधरा दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. या घटनेनंतर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय.

Full View

 

 

 

Similar News