चर्चा तर होणारचं ! धनंजय मुंडे यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची गळाभेट

विधानपरिषद निवडणूकीसाठी मतदान सुरू आहे. त्यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची गळाभेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Update: 2022-06-20 07:06 GMT

विधानपरिषद निवडणूकीसाठी मतदान सुरू आहे. तर भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते आपले उमेदवार जिंकणार असल्याचा दावा करत आहेत. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेते चंद्रशेखर यांची गळाभेट घेतली. मात्र या भेटीनंतर विधीमंडळ परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडीची मतं फुटणार असल्याचा दावा केला जात आहे. तर महाविकास आघाडीकडूनही भाजपचे आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर मुंडे आणि बावनकुळे यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे.

भाजपने चार जागांसाठी पाच उमेदवार दिले आहेत. मात्र पाचव्या जागेसाठी भाजपला अतिरीक्त 20 मतांची आवश्यकता आहे. तरीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे पाचही उमेदवार जिकतील असा दावा केला आहे. त्याबरोबरच पाचवा उमेदवार हा चारही उमेदवारांच्या मतांपेक्षा अधिक मतांनी निवडून येईल, असा दावा केला आहे.


Tags:    

Similar News