मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत असेल तर गुजरातच्या गांधीनगरमध्ये 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' कार्यक्रम आयोजित करावा - वर्षा गायकवाड

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल 'व्हायब्रंट गुजरात' ग्लोबल समिट 2024 कार्यक्रमाच्या निम्मीत्ताने मुंबई मधे आहेत. 'व्हायब्रंट गुजरात' ग्लोबल समिट 2024 हा कार्यक्रम हॉटेल ताजमहल पँलेस ईथे पार पडला, मात्र मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या या दौऱ्याला विरोधी पक्षाने चांगलच टार्गेट केल्याचं पहायला मिळत आहे.

Update: 2023-10-11 13:28 GMT

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत असेल तर गुजरातच्या गांधीनगरमध्ये 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' कार्यक्रम आयोजित करावा - वर्षा गायकवाडगुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल 'व्हायब्रंट गुजरात' ग्लोबल समिट 2024 कार्यक्रमासाठी मुंबई दाखल झाले आहेत. 'व्हायब्रंट गुजरात' ग्लोबल समिट 2024 हा कार्यक्रम हॉटेल ताज महल पँलेस येथे पार पडला. मात्र, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या या दौऱ्यावर विरोधीपक्षाकडून जोरदार टीका केल्याचं पहायला मिळत आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हणाले की "गुजरातमध्ये उद्योगधंदे वाढवावेत यासाठी हा खटाटोप सुरु असल्याचं म्हणत भाजपवर निशाना साधला आहे. त्याच बरोबर त्यांनी एक्स पोस्ट च्या माध्यमातून नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नाव न घेता टीका केली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री आज मुंबईत आहेत... 'व्हायब्रंट गुजरात' रोड शो साठी. गुजरातमध्ये उद्योगधंदे वाढावेत ह्यासाठी हा खटाटोप.

तर या नंतर आता काँग्रेस नेत्या आमदार वर्षा गायकवाड यांनी देखील सरकारवर निशाना साधला आहे. त्या म्हणाल्या

" व्हायब्रंट गुजरातसाठी ते मुंबईत आले आहेत. मुंबईत काय ? कशासाठी ? व्हायब्रंट कार्यक्रम मुंबईमधे ठेवण्यामागे महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवून घेऊन जाण्यासाठी तर नाही ना? असा थेट सवालं उपस्थित केला आहे.

एकीकडे महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करायचे, दुसरीकडे गुजरातच्या औद्योगिकीक करणाला चालना द्यायची हाच यांचा एकमेव अजेंडा आहे. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी गुजरातच्या गांधीनगरमध्ये 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' कार्यक्रम आयोजित करून दाखवावा. असाही घणाघात वर्षा कायकवाड यांनी केला आहे.

Tags:    

Similar News