मोदी एकतंत्री प्रशासक: प्रणब मुखर्जी

'द प्रेसिडेन्शियल इयर्स' या प्रणब मुखर्जी यांच्या आत्मचरित्रात मोदी यांची कार्यशैली, त्यांनी घेतलेले निर्णय यावर कठोर शब्दात टीका केली आहे... तर कॉंग्रेसला देखील खडे बोल सुनावले आहेत...

Update: 2021-01-06 04:15 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाच्या शैलीबाबत अनेक नेत्यांनी आत्तापर्यंत आक्षेप घेतले आहेत. ते कोणाचं ऐकत नाहीत. ते एकतंत्री एकाधिकारशाही कारभार करतात. यावर दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी देखील भाष्य केलं आहे. प्रणब मुखर्जी यांच्या 'द प्रेसिडेंसियल इयर्स, 2012-2017' आत्मचरित्राचा चौथा भाग प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये त्यांनी...

जवाहरलाल नेहरू असो की इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी असो की मनमोहन सिंह असो, या सर्वांनी संसदेच्या कामाकाजामध्ये भाग घेत आपला ठसा उमठवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असहमत असलेल्या लोकांना ऐकून घेतलं पाहिजे. असा सल्ला मोदी यांना दिल्याचं सांगितलं आहे.

मुखर्जी यांच्या मते देश चालवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना समजावून देशातील विविध समस्या सोडवण्यासाठी संसदेचा एक मंच म्हणून उपयोग करायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी संसदेत उपस्थित राहायला हवं. यामुळे कामकाजावर मोठा फरक पडतो. मोदी सरकार आपल्या पहिल्या काळात संसद चालवण्यात अपयशी ठरलं.

असं मुखर्जी यांनी 'द प्रेसिडेन्शियल इयर्स' या पुस्तकात म्हटलं आहे.

नोटाबंदीचा निर्णय राष्ट्रपतींना सांगितला नाही...

मोदींनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा देशाला मोठा फटका बसला. याबाबत मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे. नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोदी यांनी प्रणब मुखर्जी यांची भेट घेतली. नोटाबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ च्या अगोदर मोदी यांनी देशाच्या राष्ट्रपतीशी कोणतीही चर्चा केली नाही. असं मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

'मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केल्यानंतर ते मला राष्ट्रपती भवनात भेटायला आले. आणि या निर्णयामागची कारणे सांगितली.

काळा पैसा बाहेर काढणे, भ्रष्टाचाराचा मुकाबला करणे, दहशतवाद्यांचा निधी रोखणे. अशी तीन कारण दिली. आणि या निर्णयाला माजी अर्थमंत्री म्हणून पाठींबा मागितला. मी तत्वत: पाठींबा देणारं निवेदन जारी केलं. पण नोटाबंदीचा काही उपयोग होणार नाही. असं देखील सांगितलं'

असं मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

केजरीवाल यांना सल्ला...

दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या केजरीवाल यांचे त्या काळात अनेक आंदोलन गाजले. यावर मुखर्जी यांनी त्यांना बारीक सारीक गोष्टीसाठी धरणे धरू नका. असा सल्ला दिला होता. असं या आत्मचरित्रात म्हटलं आहे.

...तर मला राज्यपालांना हटवावे लागेल

2016 मध्ये तत्कालीन अरुणाचलचे राज्यपाल जे.पी. राजखोवा हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही राजीनामा देणार नसतील तर मला त्यांना काढावं लागेल. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी भाजप सरकारला सांगितलं होतं.

परराष्ट्र संबंध...

मोदी सरकारच्या काळात परराष्ट्र संबंध सुधारले असं वारंवार सांगितलं जातं. मात्र, यावर प्रणब मुखर्जी यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणतात मोदी यांनी परदेशी नेत्यांशी व्यक्तिगत संबंध प्रमाणापेक्षा वाढवले. यासाठी त्यांनी मोदी यांच्या पाकिस्तान भेटीचा उल्लेख केला आहे. डिसेंबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लाहोरला थांबले. आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ज्यावेळेला पाक आणि भारत यांचे संबंध बिघडले होते. त्यावेळी याची गरज नव्हती.

असं मत मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे.

सैनिकांबाबत...

देशाच्या सैनिकांनी ज्या कारवाया केल्या. त्या नेहमीच्या लष्करी प्रतिसादाचा भाग होता, पण त्या वेगळ्या पद्धतीने भासवण्यात आल्या. त्याची माध्यमांकडून अकारण जास्त प्रसिद्धी केली गेली. त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

कॉग्रेसला दाखवला आरसा...

2014 च्या निवडणूकीत कॉंग्रेस चा दारूण पराभव झाला. याचे कारण ते म्हणतात... कॉंग्रेस आपले करिश्माई नेतृत्व ओळखण्यात अपयशी ठरली. 2014 च्या निवडणुकांचा जेव्हा निकाल आला तेव्हा विश्वास बसत नव्हता की, कॉंग्रेस 44 जागांवर आली आहे. कॉंग्रेस एक राष्ट्रीय संस्था आहे. ती लोकांच्या जीवनाशी जोडली गेली आहे.

असं मत मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे.

Tags:    

Similar News