सुशांत सिंहचे मारेकरी एका मंत्र्याच्या गाडीतून गेले, नारायण राणे यांचा गंभीर आरोप

Update: 2022-02-19 07:41 GMT

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपुतची हत्या की आत्महत्या याबाबत सीबीआय चौकशी सुरू आहे. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपुत याची आत्महत्या नसून हत्या आहे आणि त्याची हत्या करण्यासाठी आलेले हत्यारे मंत्र्याच्या गाडीतून आले होते असा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपुत याची एक्स मॅनेजर दिशा सलियानचा बिल्डिंगवरुन पडून मृत्यू तर त्यानंतर सहा दिवसांना सुशांत सिंह राजपुत याने आत्महत्या केली होती. मात्र सुशांत सिंह राजपुत आणि दिशा सलियानची आत्महत्या नसून हत्या आहे, असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला. तर सुशांतला मारण्यासाठी गेलेले लोक मंत्र्याच्या गाडीतून गेले होते, असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला होता.

8 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपुत याची एक्स मॅनेजर दिशा सलियानचा बिल्डिंगवरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर 14 जून रोजी सुशांत सिंह राजपुत याने आत्महत्या केल्याचे समोर आले. तर त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू होते. दरम्यान ही केस सीबीआयकडे गेली. मात्र दीड वर्षानंतरही सुशांत सिंह राजपुत याच्या मृत्यूचे कारण समोर आले नाही. त्यातच नारायण राणे यांनी दिशा सलियानचा मृत्यू बिल्डिंगवरून पडून नाही तर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे.

यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, दिशा सलियानच्या मृत्यूनंतर सात महिन्यात पोस्ट मार्टम रिपोर्ट यायला हवा होता. मात्र दीड वर्षानंतरही दिशा सलियानचा पोस्ट मार्टम रिपोर्ट समोर आला नाही. तर दिशा सलियानच्या मृत्यूचे खरे कारण दडवण्यात आले. दिशा सलियानचा मृत्यू बिल्डिंगवरून पडून नाही तर तिचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप राणे यांनी केला. तर दिशा सलियान सुशांतची चांगली मैत्रीण असल्याने तिच्या मृत्यूवरून मै किसी को छोडूंगा नहीं, असे वक्तव्य सुशांतने केले होते. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचा आऱोप नारायण राणे यांनी केला.

नारायण राणे म्हणाले, पोस्ट मार्टेम रिपोर्ट सात महिन्यात पोस्ट मार्टम रिपोर्ट यायला हवा होता. पण तो अजूनही आला नाही, सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या घरातील सावन नावाचा मुलगा बेपत्ता आहे. तो सध्या कुठे आहे, दिशा सलियानचा मित्र कुठे आहे, दिशाच्या सोसायटीच्या रजिस्टरची पाने का फाडली? दिशाच्या मृत्यूनंतर तिच्या बिल्डिंगचा वॉचमन बेपत्ता का झाला? असे प्रश्न राणे यांनी उपस्थित केले.

दिशा सलियानवर सामुहित बलात्कार करून तिची हत्या करण्य़ात आली होती. तर दिशाच्या मृत्यूवर मै किसी को छोडूंगा नही, असे वक्तव्य सुशांत सिंह याने केल्याने त्याचाही खून करण्यात आल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. तर सुशांतच्या हत्येसाठी आलेले हत्यारे मंत्र्याच्या गाडीतून आले होते, असा खळबळजनक आऱोप नारायण राणे यांनी केला आहे.


Full View

Tags:    

Similar News