उध्दव ठाकरे पुन्हा अडचणीत; नवं चिन्ह वादात...

Update: 2022-10-12 06:33 GMT

उध्दव ठाकरे यांच्या समोरील अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीय़ेत. मोठ्य़ा मुश्किलीनं नवं नाव आणि मशाल हे निवडणुक चिन्ह त्यांना मिळालं पण आता त्या मशालीवरही समता पक्षानं त्यांचा दावा केला आहे. त्यामुळे मशाल नेमकी कुणाची हा नवा प्रश्न राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेची दोन शकले झाली. त्यानंतर पक्ष आणि चिन्हावर देखील दावा करण्यात आला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण निवडणुक आयोगाकडे सुपूर्द केलं. निवडणुक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नावंच गोठवलं. दोन्ही गटांना नवी नावं आणि चिन्ह पाठवण्याची विनंती आयोगाने केली. त्यानुसार ठाकरे गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह मिळालं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल तलवार हे चिन्ह मिळालं.

पण आता ठाकरे गटाच्या अडचणीचत वाढ होणं काही थांबत नाहीये. समता पक्षाने मशाल या निवडणुक चिन्हावर आक्षेप घेतला आहे. तसेच मशाल हे चिन्ह समता पक्षाचं चिन्ह असल्याचा दावा त्यांनी केला आहे. १९९६ पासून मशाल हे आमचं निवडणूक चिन्ह असल्याचा दावा दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडीस यांच्या समता पक्षाने केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी या संदर्भात निवडणुक आयोगाकडे धाव घेतली असून ते अंधेरी पुर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवारही उभा करणार आहेत असं कळतंय. विशेष म्हणजे धनुष्यबाणा आधी शिवसेनेचे तत्कालिन नेते छगन भुजबळ हे मशाल या निवडणुक चिन्हावर माझगाव विधानसभा मतदार संघातून शिवसेनेमधून निवडणुक ल़ढले होते.

Tags:    

Similar News