राज ठाकरेंमुळे भाजपचेच नुकसान...काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? वाचा

राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे भाजपचेच नुकसान होण्याचे संकेत प्रकाश आंबेडकरांनी दिले आहेत.

Update: 2024-04-11 10:33 GMT

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा शिवाजी पार्क इथे झालेल्या गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना जाहीर केली. आता महायुतीच्या प्रचारात राज ठाकरे दिसतील अशी शक्यता वर्तवण्यात आहे. १३ एप्रिल रोजी पदाधिकऱ्यांची बैठक घेत प्रचारासंदर्भात आपली पुढील दिशा राज ठाकरे स्पष्ट करणार आहेत. महायुतीला राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मात्र ही गोष्ट सपशेल खोटी ठरवत राज ठाकरेंमुळे भाजपची मुंबईतील उत्तर भारतीय मते दुरावतील, असं सांगत राज ठाकरेंच्या पाठिंब्याने भाजपला नुकसान होईल, असं संकेत देताना आपली भूमिका मांडली आहे.

मनसे अध्यक्ष यांच्या केवळ नरेंद्र मोदी पाठिंब्यामुळे मुंबईमधील कार्यकर्ते जे बिहारचे आहेत आणि जे कार्यकर्ते दक्षिणेतील आहेत. ज्यांना भाजप हा पक्ष जवळचा वाटायचा त्यांना आता राज ठाकरेंच्या या पाठिंब्यामुळे असुरक्षित वाटू लागले आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मागच्या काही काळात मुंबईसारख्या शहरामध्ये अगोदर शिवसेनेकडून बजाव पुंगी, हटाव लुंगी, असं आंदोलन करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेने आंदोलन उभं केलं होतं. धारावी या ठिकाणी मनसेकडून छटपूजेला मोठ्या प्रमाणात विरोध करण्या आला होता. त्याचबरोबर मनसेकडून बिहारमधील लोकांना मारल्याचीही आठवण यावेळी आंबेडकरांनी करून दिली. त्यामुळे उत्तर भारतीय राज ठाकरेंच्या विरोधात असतील, असं भाकीत प्रकाश आंबेडकरांनी केलं.

आज वंचितकडून मुंबईतले उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

राज ठाकरेंच्या भाजप पाठिंब्यामुळे मुंबईतल्या राजकारणाची राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेला मुंबईतली मराठी मिळतील पण उत्तर भारतीय मतं मात्र भाजपपासून दूर जाण्याची शक्यता आहे. हे समीकरण गृहीत धरूनच वंचित बहुजन आघाडी आज(गुरुवार) रोजी सायंकाळपर्यंत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करेल अशी शक्यता आहे.

Tags:    

Similar News