राज ठाकरेंची उत्तर सभा, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पहिल्या प्रतिक्रीया

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणाचे राज्यभरात पडसाद उमटले होते. तर त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली होती. त्याला राज ठाकरे यांनी उत्तर सभेतून प्रत्युत्तर दिले.

Update: 2022-04-13 03:11 GMT

राज ठाकरे यांनी उत्तर सभेत बोलताना संजय राऊत वगळता शिवसेनेवर टीका करणे टाळल्याचे दिसून आले. तर उत्तर सभेत राज ठाकरे यांचा रोख राष्ट्रवादी आणि पवार कुटूंबियांवर असल्याचे दिसून आले. त्यामुळे या भाषणावर पुन्हा राज्यभरातून प्रतिक्रीया उमटायला सुरूवात झाली. त्यातच राज ठाकरे यांच्या भाषणावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी ट्वीट करत राज ठाकरे यांचा अभ्यास कमी आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांची ‘उत्तर’ पत्रिका कॉपी करावी लागत असल्याची टीका केली आहे. (Woman And Child welfare minister yashomati Thakur on Raj Thackeray speech)

Full View

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणाचा जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला होता. त्यामध्ये संपलेल्या पक्षावर मी बोलणार नाही अशा शब्दात टोला लगावला होता. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर सभेत जयंत पाटील यांचा उल्लेख ‘जंत पाटील’ असा केला होता. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. (Jayant patil reaction on raj Thackeray speech)

जयंत पाटील ट्वीट करून म्हणाले, 2014 ला मोदींना पाठींबा, 2019 ला मोदींना विरोध आणि आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर, वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेंची, पुतण्या बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र नातं बाळासाहेब ठाकरे यांचा विचार संपवणाऱ्यांशी असे म्हणत वारंवार रंग बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत, अशा शब्दात राज ठाकरे यांनी जंत पाटील असा उल्लेख केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

Full View

संजय राऊत यांनीही राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर काही लोकांना अक्कल दाढ उशीरा येते, अशा शब्दात राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला राज ठाकरे यांनी उत्तरसभेत प्रत्युत्तर दिले आहे. त्यामध्ये राज ठाकरे यांनी संजय राऊत यांचा लवंडे असा उल्लेख केला आहे. त्याबरोबरच शरद पवार संजय राऊत यांना कधी टांगतील ते समजणारही नाही, असा इशारा दिला होता. त्यावर संजय राऊत यांनी ट्वीट करून प्रतिक्रीया दिली आहे. (Sanjay raut reaction on raj Thackeray speech)

संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, विझताना दिवा मोठा होतो. आज पुन्हा दिसते. जय महाराष्ट्र, अशी प्रतिक्रीया दिली आहे.

Full View

राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले होते की, मुंब्य्रातील प्रत्येक मशिद आणि मदरशांमध्ये माझ्यासोबत चला. जर कुठे वस्तरा जरी आढळला तरी मी राजकारण सोडेल. त्याला राज ठाकरे यांनी गेल्या काही वर्षात मुंब्रा भागात आढळलेल्या दहशतवाद्यांची यादी वाचून दाखवली. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले, खरंतर आम्हाला इतक्या खालच्या पातळीवर उतरायचे नव्हते. शब्दांची कोटी आम्हालाही करता येते. टिंगल टवाळी आम्हालाही करता येते. खरंतर  इतक्या खालच्या पातळीवर उतरायचं नसतं. पण तुम्ही  उतरू शकता तर आम्हीही उतरू शकतो राजसाहेब, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना इशारा दिला. 

पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, देशाच्या चित्रपट सृष्टीला जॉनी लिव्हर जे देऊ शकला. ते नंतर कोणीही देऊ शकले नाही. आज महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर एक जॉनी लिव्हर जन्माला आला आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा. जशाच तसे उत्तर ही तुकाराम महाराजांची शिकवण, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. 

Full View
Tags:    

Similar News