१२ आमदारांच्या नियुक्तीचा वाद, अजित पवार – देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी

Update: 2021-03-01 06:58 GMT

विधिमंडळाच्या बजेट अधिवेशनात राज्यपालांकडे प्रलंबित असलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्द्यावरुन जोरदार खडाजंगी झाली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यावरुन अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. राज्य सरकार मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.

पण ज्या दिवशी बारा आमदारांच्या नावांना राज्यापालांची मंजुरी मिळेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास महामंडळाला मंजुरी दिली जाईल असे अजित पवार यांनी म्हणतात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला. तुमच्या मनातल ओठावर आले; राज्यपाल हा तुमचा विषय आहे, बारा आमदारांसाठी सभागृहाला आणि महाराष्ट्राल ओलीस धरु नका असा टोला लगावला.

Tags:    

Similar News