मी अमित शहांना विचारणार आहे:सुप्रिया सुळे

Update: 2022-03-23 08:06 GMT

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना मी विचारणार आहे की, यासारख्या कारवाईच्या माध्यमातून काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय जनता पक्षात आले की नेते हे फार स्वच्छ होतात असे सध्या चित्र आहे अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

महागाई आणि मुख्य मुद्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी यासारख्या कारवाई सध्या राज्यात सुरु आहे.ई डी आणि इतर तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्यातील महविकास आघाडीचे सरकार पडणार नाही . खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी हे मान्य करीत २०२४च्या निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.राज्यात उद्धव ठाकरे यांच्या पाहुण्यावर करण्यात आलेली कारवाई ही निंदनीय आहे. या प्रकारच्या निवडक कारवाई का होत आहे.

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना मी विचारणार आहे की, यासारख्या कारवाईच्या माध्यमातून काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय जनता पक्षात आले की नेते हे फार स्वच्छ होतात असे सध्या चित्र आहे , असल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले.

Full View
Tags:    

Similar News