भारत जोडो यात्रेत गेहलोत-पायलट एकत्र... | Bharat Jodo Yatra | Rajastan

Update: 2022-12-05 06:00 GMT

राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज पहिला दिवस आहे. आज सोमवारी सकाळी 6.11 च्या सुमारास झालावाड येथील काली तलाई येथून यात्रेला सुरुवात झाली. काझी तलाई ते बळी बोर्डा असा सुमारे 14 किलोमीटरचा प्रवास करून यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.




 


या प्रवासात त्यांच्यासोबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा हेही त्यांच्यासोबत होते. आता लंच ब्रेक आहे. दुपारनंतर पदयात्रेचा दुसरा टप्पा सुरू होईल. दरम्यान, यात्रेत सहभागी झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार रघुवर मीना पडून किरकोळ जखमी झाल्याची देखील घटना आज घाली.




 


अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रताप सिंह खचरियावास, गृहरक्षक राज्यमंत्री राजेंद्र गुडा, माजी केंद्रीय मंत्री भंवर जितेंद्र, ओसियाचे आमदार दिव्या मदेरणा हेही पहाटे यात्रेत सामील झाले. यापूर्वी रविवारी रात्री माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या झालावाड भागातून भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये दाखल झाली होती.




 


पहिल्या दिवशी, सुमारे दीड तासांच्या सुरुवातीच्या प्रवासानंतर, राहुल गांधी झालरापाटनच्या रायपूर गेटजवळ असलेल्या ढाब्यावर चहासाठी थांबले. या प्रवासाचा दुसरा टप्पा दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. पहिल्या टप्प्यात राहुल गांधी तीन तास चालले. आता त्यांचा मुक्काम झालरापाटण येथील बळी बोर्डा येथील यात्रा छावणीत आहे.




 


राहुल गांधी राजस्थानमध्ये यात्रेच्या पहिल्या दिवशी 34 किलोमीटरचे अंतर कापतील. भारत जोडो यात्रेत आतापर्यंत सरासरी 24 किलोमीटरचा प्रवास केला जात होता, मात्र आता राजस्थानमध्ये वेग वाढवला जात आहे. गेहलोत-पायलट या दोघांचेही समर्थक यात्रेत सहभागी होत आहेत.



राहुल गांधींचा आजचा कार्यक्रम कसा असेल... 




 


 


Tags:    

Similar News