Mahadev Jankar | भुजबळ आमचे दैवत, महादेव जानकर यांचं वक्तव्य

Update: 2023-10-14 11:38 GMT

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ संघर्ष रंगल्याचं पहायला मिळत आहेत. त्यापार्श्वभुमीवर महादेव जानकर यांनी भुजबळ आमचे दैवत असल्याचं वक्तव्य केलं आहे.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर एकेरी टीका केली. तर भुजबळ यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला पैसा कुठून येत असल्याचा सवाल उपस्थित केला. त्यानंतर छगन भुजबळ यांना धमक्याचे फोन आले. त्यावरून महादेव जानकर यांनी इशारा दिला आहे.

छगन भुजबळ यांना धमकी येणं चुकीचं आहे. अशा धमक्या देणं चुकीचं आहे. भुजबळ हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे, त्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भुजबळ यांना धमकी येणे, हे चुकीचे आहे. अशा धमक्या देणे योग्य नाही. भुजबळ ओबीसी समाजाचे माईलस्टोन नेते आहेत. भुजबळ आमचे दैवत आहेत. त्यांना धमकी येत असेल तर बाकीचा समाज गप्प बसणार नाही. त्यामुळे धमकी देणाऱ्यांनी या भानगडीत पडू नये. नाहीतरत आम्हाला विचार करावा लागेल, असाच थेट इशारा जानकर यांनी दिला.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच काँग्रेसने मराठ्यांना आजवर खेळवत ठेवल्याची टीका महादेव जानकर यांनी केली.

Tags:    

Similar News