Twitter war : नाव बदलण्यावरून मनसेच्या टीकेला दिपाली सय्यद यांचे उत्तर

राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावरून दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला मनसेने प्रत्युत्तर देतांना दिपाली सय्यद यांनी वेगवेगळ्या निवडणूकांमध्ये नाव बदलल्याचा दावा करत टीका केली. त्या टीकेला दिपाली सय्यद यांनी प्रत्युत्तर दिले.

Update: 2022-05-21 06:27 GMT

राज ठाकरे यांच्या आयोध्या आयोध्या दौऱ्याला खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी विरोध केला. या विरोधावरून दिपाली सय्यद यांनी निशाणा साधला. यावेळी दिपाली सय्यद यांनी ट्वीट करून म्हटले होते की, पावसाचे कारण देऊन मैदान सोडले भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामु मिळाले.

दिपाली सय्यद यांनी केलेल्या टीकेनंतर मनसे नेते अखिल चित्रे यांनी व्हिडीओ पोस्ट करत दिपाली सय्यद यांच्यावर टीका केली होती. त्यामध्ये अखिल चित्र यांनी म्हटले की, अवसरवादी ताई तुम्ही प्रत्येक निवडणूकीत नाव बदलता. अहमदनगरमधून निवडणूक लढवली तर दीपाली सय्यद, मुंब्रा कळव्यातून निवडणूक लढवली तर सोफिया जहांगिर सय्यद आणि शिवसेना शिवसंग्राममध्ये असताना दिपाली भोसले सय्यद. त्यामुळे अवसरवादी ताई तुम्ही पहिले नाव ठरवा धड असा टोला लगावला होता. त्याला दिपाली सय्यद यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दिपाली सय्यद यांनी मनसेने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे यांचे लग्न होऊन ते जर सासरी गेले असते तर त्यांना समजले असते की, लग्नानंतर नाव बदलतात ते. तसेच पुढे बोलतना म्हणाल्या की, लग्न झाले आणि सासरे गेले की नाव बदलले जाते. ते कोणी सुरू केले माहित नाही. हल्ली अनेक मुली नाव बदलत नाहीत. मात्र मी पारंपरिक आहे. त्यामुळे लग्नानंतर माझ्या नवऱ्याने माझे नाव लाडाने सोफिया असे ठेवले.तसेच माझ्या नवऱ्याची आणखी बायका नाहीत. मी 25 वर्षे संसार केला आहे, असं सांगितलं आहे.

दिपाली सय्यद यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाला अखिल चित्रे यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे.

अखिल चित्रे यांनी म्हटले आहे की,लाडाची सोफिया..आपल्याकडे लग्नानंतर नाव बदलायची प्रथा आहे. पण बहुदा तुमच्याकडे प्रत्येक निवडणुकीत आणि ठिकाणाच्या सोयीनुसार वैयक्तिक स्वार्थासाठी नाव बदलायची प्रथा आहे. तसेच कुणाचे हात पकडून राजकारण करायचे आहे ते तुम्ही एकदा फायनल ठरवा. कभी आप कभी शिवसंग्राम तर कधी सेना विचारांची भेसळ असल्याची टीका अखिल चित्रे यांनी केली आहे.

Tags:    

Similar News