भास्कर जाधव यांनीच शिव्या दिल्या: देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

देवेंद्र फडणवीस यांचा हा आरोप तुम्हाला पटतो का?

Update: 2021-07-06 07:35 GMT

मला आई बहिणीवरुन शिव्या देण्यात आल्या. असा आरोप तालिकाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केल्यानंतर गोंधळ घातलणाऱ्या 12 आमदारांना निलंबीत करण्यात आलं आहे. 12 Mla Suspended Maharashtra Monsoon Session त्यानंतर सभागृहात विरोधकांची दडपशाही केली जात आहे असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. त्यामुळे भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर अभिरूप विधानसभा भरवली.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आमचं अधिवेशन शांततेत Maharashtra Monsoon Session सुरू होतं पण या ठिकाणी मार्शल पाठवण्यात आले. पत्रकारांचे कॅमेरे बंद करण्यात आले. आम्ही प्रेस रूममध्ये आम्ही अधिवेशन चालवू. आम्ही पुन्हा विधानसभा सुरू करत आहोत. मीडियाचे कॅमेरे खेचण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्ताधाऱ्यांनी काळा अध्याय लिहीला आहे, ही महाराष्ट्रातली आणीबाणी आहे. तसंच भास्कर जाधव यांनीच शिव्या दिल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. Maharashtra Monsoon Session Live Updates

Full View

नक्की काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. हा प्रस्ताव मांडताना छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ओबीसी आरक्षण जाण्याला भाजप जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. छगन भुजबळ यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमुळे विरोधी बाकांवरील सर्व सदस्यांनी गोंधळ घातला. या गोंधळातच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

हा प्रस्ताव मंजूर होत असताना आमदार गिरिश महाजन आणि आमदार संजय कुटे हे थेट तालिकाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या समोर येऊन घोषणा देऊ लागले. या घोषणा देत असताना भास्कर जाधव यांनी त्यांना समज देखील दिली. मात्र, ही घोषणाबाजी सुरु असतानाच भास्कर जाधव यांनी प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा करत, सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं.

त्यानंतर अध्यक्षांच्या चेंबरमध्ये बैठक झाली. या बैठकीत तालिकाध्यक्षांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला. धक्काबुक्की करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मलिक यांनी केली आहे. भाजप नेते धमकी आणि गुंडगिरीचं काम करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

यावर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळले. मात्र, सभागृहात तालिकाध्यक्ष भास्कर जाधव यांनी मला आई बहिणीवरुन शिव्या देण्यात आल्या. असं सांगितलं. त्यानंतर अशा प्रकारचा गोंधळ झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी देखील मान्य केलं.

Tags:    

Similar News