महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार…?

Update: 2022-04-01 10:52 GMT

पाच राज्याच्या पराभवानंतर काँग्रेस मध्ये मोठे फेरबदल होताना दिसत आहेत. काँग्रेस च्या अंतरीम अध्यक्ष सोनिया गांधी पुन्हा एकदा active mode वर असून त्या सातत्याने बैठका घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अनेकांना नारळ देत असल्याचं समजतंय.

पक्षाअंतर्गत अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागितले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र काँग्रेस मध्ये देखील मोठे फेरबदल केले जाणार आहेत. राज्यात काँग्रेस सत्तेत असून देखील आमदारांची काम होते नाहीत. पक्षातील कार्यकर्त्याना सापत्न वागणूक मिळते. याच्या तक्रारी वारंवार केल्या जात आहेत. ही बाब लक्षात घेता

राज्याचे सहप्रभारी बी एम संदीप यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसंच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांची देखील आगामी काळात गच्छंती होण्याची शक्यता आहे. काँग्रेस मधील विरोधात झेंडा हातात घेतलेल्या जी 23 गटाच्या दबावानंतर पाच ते सहा प्रभारी बदलण्यात येणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांच्या बद्दल देखील अनेक तक्रारी असल्याची माहिती सुत्रांनी दिली असून आगामी काळात त्यांना देखील कार्यमुक्त केलं जाण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News