चंद्रकांत पाटील यांची भाषा घसरली, शरद पवार यांचा एकेरी उल्लेख

Update: 2021-10-15 14:08 GMT

राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमधील शाब्दिक संघर्ष पेटला आहे. पण या संघर्षात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची शरद पवार यांच्यावर टीका करताना भाषा घसरली आहे. "राज्यात शरद पवार यांचे आम्हाला आव्हानच नाही कारण 54 आमदारांच्यावर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60च्या वर तो गेला नाही" अशी भाषा चंद्रकांत पाटील यांनी वापरली आहे. सांगलीमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. पुढील निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील नेतृत्वाला राजकीय शोक देईल त्या भाजपच्या नेत्याला मी खऱ्या सोन्याचा मुकुट देईन, अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

Tags:    

Similar News