शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या गाडीवर हल्ला


Update: 2021-04-02 12:37 GMT

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सरकारसमोर आव्हान देत असलेल्या शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. दिल्ली येथे गेल्या ४ महिन्यांपासून केंद्र सरकारने पारित केलेल्या ३ कायद्यांविरोधात आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारने साम, दाम, दंड, भेद नीति वापरल्याचा आरोप विरोधक सरकारवर करत आहे. 



या सर्व आंदोलनात महत्त्वाची भूमिका राबवणारे नेते राकेश टिकैत सध्या भाजप सरकारविरोधात देशभर सभा घेत आहेत. आज शुक्रवारी टिकैत राजस्थानच्या दौऱ्यावर होते. बानसूर येथे एका सभेला ते संबोधित करणार होते. या दरम्यान ततारपुर (अलवर) येथे त्यांच्यावर जमावाने हल्ला केला आहे. जमावाने त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या, टिकैत यांच्यावर शाही फेकण्यात आल्याचं समजतंय.
 मात्र, पोलिसांनी तात्काळ नियंत्रण मिळवत त्यांना बानसूर येथे सभेला पोहोचवल्याची प्राथमिक माहिती आहे.


Tags:    

Similar News