MP Board Result 2023 Date: दहावी आणि बारावीचे निकाल लवकरच जाहीर होणार...

एमपी बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यापासून विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा करत आहेत. परंतु या सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे.

Update: 2023-04-29 04:37 GMT

एमपी बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यापासून विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा करत आहेत. परंतु या सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. विद्याथ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मध्य प्रदेशचे प्रोफेशनल एग्जामिनेशन बोर्ड लवकरच निकाल जाहीर करेल. शालेय शिक्षण मंत्री इंदरसिंग परमार हे पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करतील. आणि त्या नंतर विद्यार्थी एमपी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासले जाऊ शकतात.

एमपी बोर्ड 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी या संदर्भातील पूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाला बाबतची पूर्ण माहिती मिळेल आणि त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. थोडक्यात सांगायचे तर पुढील आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होऊ शकतात. बारावीची परीक्षा ५ एप्रिलपर्यंत तर दहावीची २७ मार्चपर्यंत चालली होती. तर निकाल यायला एक महिना लागेल, असे मानले तर पुढच्या महिन्यापर्यंत निकालही लागतील.

मागील वर्षी एमपी बोर्ड 10वी आणि 12वीचा निकाल 29 एप्रिल 2023 रोजी जाहीर झाला होता. विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या वर्षी दहावीत ५९.५४ टक्के तर बारावीत ७२.७२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. याशिवाय जास्तीत जास्त दोन विषयांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेत उत्तीर्ण होण्याची संधी दिली जाते. या अंतर्गत ते कंपार्टमेंट परीक्षा देऊ शकतात.

विद्यार्थी त्यांच्या गुणांवर समाधानी नसल्यास, तुम्ही पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकता. यासाठी निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळाने फॉर्म काढला जातो. ज्या उमेदवारांना पुन्हा तपासून पाहिजे पेपर ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात, याअंतर्गत त्यांना ठराविक शुल्कही भरावे लागणार आहे.

निकाल कसा चेक करायचा  

mpbse.nic.in या अधिकृत वेबसाइटला (MPBSE) भेट द्या.

लिंकवर क्लिक करा, "MPBSE इयत्ता 10वी/12वीचा निकाल 2023 डाउनलोड करा."

लॉगिन विंडोवर, तुमचा रोल नंबर आणि इतर आवश्यक माहिती प्रविष्ट करा

तुमचा एमपी बोर्ड 10वी निकाल 2023′ आणि 'एमपी बोर्ड 12वी निकाल 2023' स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

निकाल डाउनलोड करा

Tags:    

Similar News