हा घ्या आणखी एक पुरावा…!

गांधीजींनी सावरकरांना इंग्रजांना माफी मागण्यास सांगितलं. असं विधान राजनाथ सिंह यांनी केलं आहे. मात्र, राजनाथ सिंह यांच्या या विधानाला आधार म्हणून जे पुरावे उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून तसंच भाजपच्या लोकांनी मांडले आहेत. त्यात तरी तथ्य आहे का? वाचा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केलेले विश्लेषण

Update: 2021-10-13 13:36 GMT

गांधीजींनी सावरकरांच्या भावाला लिहिलेलं हे पत्र. २५ जानेवारी १९२०. सावरकरांच्या सुटकेसाठी काय प्रयत्न केले पाहिजेत हे ते सांगतात.

सावरकरांनी माफी १९११ आणि १९ १३ साली मागितली. (गांधी १९१५ साली भारतात परतले.)

तरी सुटका झाली नाही म्हणून सावरकरांच्या भावाने हताश होऊन गांधींना विनंती केली.( १८ जानेवारी १९२०) त्यात सावरकर तुरुंगात कसे आजारी आहेत,खचले आहेत हे कळवळून लिहिलं.

त्यावर गांधींनी दोन सूचना केल्या-

१) जनमत तयार करणे

२) व्यक्तिगत प्रयत्न.

या प्रयत्नाचा भाग म्हणून गांधींनी 'यंग इंडिया'तून सावरकरांच्या सुटकेची मागणी केली.




 




























यात कुठेही माफीनाम्याचा उल्लेख नाही. कारण सावरकरांनी ते आधीच दिले होते.

याच वि.दा.सावरकरांनी आयुष्यभर गांधींचा द्वेष केला. पुढे नथुरामला गांधीहत्येची चिथावणी दिली असा आरोप त्यांच्यावर होता.पण पुराव्याअभावी सावरकर सुटले, 'निर्दोषत्व'सिद्ध झालं म्हणून नाही. ज्या गांधींनी मदत केली त्यांच्यावर सावरकर उलटले, गांधीनी मात्र उदार मन दाखवलं.

आता सावरकरांना भारतरत्न देण्याची मोदींची इच्छा असल्याने 'गांधींनी सावरकरांना माफीचा सल्ला दिला'असं राजनाथ सिंह म्हणत आहेत. गांधींमुळे तरी सावरकरांची रंगसफेदी होईल अशी आशा संघ परिवाराला असावी!

निखिल वागळे, ज्येष्ठ पत्रकार

Tags:    

Similar News