बोला लोक हो... बोला... उठा

खोट्या प्रचारकी सिनेमाच्या माध्यमातून प्रिव्हीलेज्स जपू पाहणाऱ्या डाव्या, उजव्या किंवा मधल्या विचारांवर प्रहार केला आहे सुनील गजकोश यांनी..

Update: 2022-03-20 03:20 GMT

बॉलिवुडने गेली ७५ वर्षे हिंदु-मुस्लिम एकते वर सिनेमे बनविले, जात यातून गायब होती कारण सिनेमे बनविणारे दोन्ही समाजाचे लोक उच्चवर्णिय होतो, मग ते डाव्या, उजव्या किंवा मधल्या विचारांचे असू द्या. पण एक काश्मीर फाईल सारखा सिनेमा ७५ वर्षांच्या बॉलिवुडच्या सेक्यूलर परंपरेला उखडून टाकण्याचा प्रयत्न करित आहे आणि अख्खं बॉलिवूड सेक्यूलर चँपियन घाबरून गप्प बसले आहेत. या खोट्या प्रचारकी सिनेमातल्या मुद्यांविरूद्ध त्यांनी आपली साधने वापरून जोरदार प्रतिहल्ला करायला हवा होता… पण सगळे चिडीचूप... मला समजत नाही की… यांना आपले प्रिव्हीलेज्स जातील याची भिती का वाटते…

सगळे प्रिव्हीलेज्स जातीय लेगसीतून आलेली आहेत… वरून हे लोक सेक्यूलर आहेत... सेक्यूलरच्या चौकटीत उच्च जातीय हिंदु काहीही बोलले तरी ते सेफ आहेत… फक्त जातीय ओळखीचा मुद्दा आला तर प्रोब्लेम असतो… म्हणून बोलायला काय हरकत आहे? झुंड सारख्या सिनेमाला जो की बॉलिवुडच्या सेक्यूलर नरेटिव्हसला झेपत नाही त्यावर जातीयवादी सिनेमा म्हणून भरपूर टिका झाली आहे… त्यात सवर्णांवर टिका नाही… त्यांनी जात दाखवली नाही... तरी यांना राग यतो… मग ते झुंड विरूद्ध कॅपेन चालवतात… म्हणजे सत्य दाखविणाऱ्या विरूद्ध उभे राहतात.. पण काश्मीर फ़ाईल तर सेक्यूलर लोकांचे दानवीकरण करीत आहे… अर्धसत्य, एकेरी चित्रण आणि द्वेष भावना निर्माण करण्यावरच सिनेमा बनविला आहे.... तरी ह्या सगळ्या समुहातून आवाज काही येत नाही… एक दोन अपवाद सोडू या…

चित्र स्पष्ट आहे या देशातला सवर्णाना फक्त स्वताला व्हिक्टीम म्हणूनच सादर करायचे आहे…. त्यांना ते इतिहसाचे व्हिक्टीम आहेत असे वाटते आणि १९९० पासून आरक्षण धोरणाचे ही विक्टीम आहेत असे वाटते... या दोन्ही सेफ पण खोट्या मुद्यांवर ते सगळीकडे बोलतात...

या देशाच्या प्रत्येक संस्थेवर राज्य करणारे, सगळ्या साधनांवर नियंत्रण करून असणारे, राजकारण, न्याय व्यवस्था, आध्यत्मिक, मनोरंजन, साहीत्य क्षेत्र, पोलीस-सैनिक व्यवस्था… सगळ्यांवर आपले निर्विवाद वर्चस्व असणारे सवर्ण… असे का वागतात… त्यांना सर्वस्व हातातून जाण्याची एवढी भिती का वाटते… कि यांना सत्याचीच भीती का वाटते? म्हणजे हा देश ज्यांच्याकडे गमाविण्यासारखे काहीच नसते… अशा गरिब, आणि शोषित लोकांनीच वाचवावं, लढावे किंवा मरावे… या साठी सोडून दिला तर नाही ना?

सवर्ण जाती व धार्मिक मान्यता मिळावी म्हणून कट्टरते कड़े जाणाऱ्या काही OBC जाती… यातून निर्माण झालेला घाबरट मध्यमवर्ग… ह्यांना जे ज़र नाही समजलं तर… हातातील लोकशाहीचं काही खरं नाही…

बोला लोक हो... बोला... उठा... आता विस्तापीत झालेले काश्मीरी पंडीतही या सिनेमात मांडलेल्या अर्धसत्या विरूद्ध बोलले आहेत... तुम्ही बोला...

Tags:    

Similar News