राजकीय समर्थक म्हणजे काय रे भाऊ?

एखाद्या पक्षातील नेत्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे त्या पक्षाचा तो व्यक्ती विरोधक होतो का? किंवा एखाद्या पक्षाच्या नेत्याची भाषण, किंवा स्वभाव आवडला म्हणजे तो त्या पक्षाचा चाहता होतो का? वाचा Adv. असिम सरोदे यांचं विश्लेषण

Update: 2021-09-10 06:05 GMT

मोदी आणि शाह या राजकारणातील वाईट प्रवृतींच्या विरोधात असणे म्हणजे सरकारच्या विरोधात असणे नसते. मोदी व शाह यांना विरोध म्हणजे भाजप ला विरोध असे समजणे चुकीचे ठरते.

लोकशाही व लोकशाही प्रक्रियांबद्दल बोलणे म्हणजे काँग्रेसची बाजू घेणे असा अर्थ काढणे चुकीचे असते.

उद्धव ठाकरे यांच्या माणूसपणाच्या संवादामुळे ते कुणाला आवडत असतील, आपल्यातील वाटत असतील तर याचा अर्थ ते संपूर्ण शिवसेनेचे समर्थक आहेत असा काढणे अर्धवटपणा असू शकतो.

राष्ट्रवादी असे नाव असले म्हणून त्यात कुणीच भ्रष्टाचार करणारा नाही असे होत नसते पण म्हणून अजित दादा यांच्या जलद व निर्णयक्षम कामाच्या पद्धतीबद्दल किंवा सुप्रिया सुळे यांच्या समाजात मिळून-मिसळून राहण्याबद्दल व त्यांच्या बुद्धिमत्तेबाबत कुणी तारीफ केली की लगेच तो व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचा असे होत नसते.

राज ठाकरे यांची भाषणे आवडणारे सगळेच मनसे ला मत देत नसतात. पण म्हणून राज ठाकरे प्रभावी नाहीत, त्यांना कधीच यश मिळणार नाही, त्यांच्याकडे नेतृत्व गुण नाहीत असे समजणे चुकीचे ठरू शकते.

मुळात इतरांना राजकीय पक्षांचे लेबल लावण्याची घाई असलेले खूपच वाढले आहेत आणि कुणीतरी केवळ नागरिक असू शकतो अशी शक्यताच गृहीत धरली जात नाही हे चुकीचे आहे.

Tags:    

Similar News