कसे राहतील केस चांगले , जाणून घेऊया

Update: 2023-11-26 13:30 GMT

वय,जीन्स यांसारख्या अनेक गोष्टींवर केसाचे आरोग्य अवलंबून असते आणि केसांच्या आरोग्यासाठी मह्त्वाचा घटक म्हणजे आहार . केसाचे आरोग्य आणि सकस आहार हे दोन्ही स्त्री व पुरुष यांचे जिव्हळ्याचे विषय आहे . केस निरोगी न राहण्याचे अनेक कराणे आहेत मात्र महत्वाचे कारण म्हणजे केसांना व्यवस्थित न मिळणारे पोषण. एखादा माणूस सशक्त आहे हे समजण्याचे कारण म्हणजे त्यांचे केस असे मानले जाते .

आताच्या काळात प्रदूषण हा मुद्दा आहेच मात्र केस सशक्त राहण्यासाठी नियमित व व्यवस्थित आहार घेणं हे हि तितकाच महत्वाचा आहे. भारतीय आहारामध्ये असे काही पदार्थ आहेत त्यामुळे तुम्ही तुमचे केस हे निरोगी आणि सशक्त ठेऊ शकता आणि निश्चितच त्यामुळे तुमचे शरीराचे आरोग्य देखील उत्तम राहील .

केसांच्या आरोग्यासाठी अनेक पदार्ध लाभदायी आहेत त्यामध्ये अंड,बोरफळ,बोर,गोड भोपळी मिरची,सोयाबीन,मेथीचे दाणे,पालक,मासे,खोबरे,रताळे,अवोकाडो,खेकडे,सूर्यफुलाच्या बिया आणि कढीपत्ता इत्यादी पदार्थांचा समावेश होतो.या पदार्थांमुळे तुमचे केस न गळण्यास मदत होते व ते तितकेच निरोगी राहण्यास ही .

योग्य प्रमाणात प्रथिने जर तुम्ही खाऊ शकलात तर तुमच्या केसांच्या पेशींना जणू काही संजीवनीच मिळेल असं आपल्याला म्हणता येईल . आहारात कमी प्रथिने असणं हे केस गळण्याचे मोठ कारण आहे . अनेकदा वजन कमी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात न घेतलेला आहार व त्यामुळे केसांच्या पेशीला न मिळणारे प्रथिने आणि लागणारी ऊर्जा या मुळे केस गळतील सुरुवात होऊ शकते . शहरातील बायोटिन चे प्रमाण वाढल्याने केस गळती थांबण्यास मदत होते .

Tags:    

Similar News