कोरोना: गर्भवती महिलांना लसीकरणाची परवानगी...

Update: 2021-07-02 14:51 GMT

गर्भवती महिला आता कोरोनाची लस घेऊ शकतात. त्यासाठी गर्भवती महिलांना CoWIN Application वर रजिस्ट्रेशन करायचं आहे. मात्र, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर गर्भवती महिलांना लस घेण्यासाठी COVID-19 वॅक्सीन सेंटरवर जावं लागणार आहे.

आत्तापर्यंत बाळाला जन्म दिलेल्या म्हणजे स्तनदा मातांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता गर्भवती महिलांच्या आणि त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना देशाच्या आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात डॉ बलराम भार्गव यांनी माहिती दिली आहे...

आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात दिशानिर्देश दिले असून गर्भवती महिलांचं लसीकरण केलं जाणार आहे. लसीकरण या महिलांसाठी उपयोगी असून त्यांनी लस दिली पाहिजे. असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान यावेळी सरकारच्या अधिकाऱ्यांनी देशात दररोजच 50 लाख लस घेत असून दुसरी लाट अजून संपली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Tags:    

Similar News