महाराष्ट्रात सध्या पावसाची परिस्थिती काय? । maharashtra rain update

Update: 2023-07-28 15:05 GMT

गेल्या आठवडाभर मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. गुरुवारपर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा रेड अलर्टही देण्यात आला होता. मात्र आज अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागच्या दहा दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा, कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात सध्या पावसाची परिस्थिती काय आहे? कोणत्या भागात किती पाऊस झाला आहे? महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका कोणत्या जिल्यात आहे? जाणून घेण्यासाठी संपूर्ण बातमी वाचा...

महाराष्ट्रात जर पाहिलं तर तीन-चार जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, कोल्हापूर, सातारा, नांदेड, पुणे या जिल्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. राज्यात मागच्या काही दिवसांपासून रेड अलर्ट जारी करण्यात आला होता पण आता हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुढच्या पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असणार आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीची परिस्थिती नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यप यांनी कोकणातील जिल्ह्यांना पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट असल्याचे सांगितले आहे. तरीही कोकण, ठाणे, रायगड, पालघर, रत्निगिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पण पुढच्या पाच दिवसांत कुठेही अतिवृष्टीची शक्यता नसल्याचं डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलं आहे..

Tags:    

Similar News