वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सध्याच्या घडीला आघाडीवर दिसत नसले तरी लोकसभा निवडणूकीत वंचित हा मोठा फॅक्टर बनून पुढे येत आहे. बहुतांश मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची मतं ही बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या पारड्यात पडल्याचं चित्र आहे. अर्थात पहिल्या दोन तासांतील मतांची आकडेवारी तशी दिसतेय. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला या दोन्ही ठिकाणी पिछाडीवर आहे. तर 48 मतदारसंघापैकी बहुतांश मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवारांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळतांना दिसत आहेत. हा अंदाज पहिल्या दोन तासांतील मतमोजणीवर आधारीत आहे.