शेकापचे आमदार जयंत पाटलांवर पत्रकाराला मारहाण केल्याची तक्रार

Update: 2019-05-24 19:49 GMT

शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यावर एका पत्रकाराने मारहाण केल्याची तक्रार केली आहे. २३ तारखेला मतमोजणी सुरु असताना अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून त्यांना मारहाण केल्याचं या पत्रकाराने म्हटलं आहे. यामध्ये काही कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे.

या घटनेच्या निषेधार्थ आता रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार एकवटले असून यामध्ये दोषी असणाऱ्यावर कारवाईची मागणी या पत्रकारांनी केली आहे. या संदर्भात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार दि 27 मे रोजी सकाळी 10 .30 वाजता मोर्चा काढण्याचा निर्णय या पत्रकारांनी घेतला आहे. या मोर्चाची सुरुवात पत्रकार भवन, समुद्र किनारा, अलिबाग येथून करण्यात येणार आहे. पोस्ट ऑफिस-काँग्रेस भवन-स्टेट बँक -कोएसो शाळा-न्यायालय-पोलीस ठाणे या मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचणार असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदना द्वारे करण्यात येणार आहे.

Similar News