बिहारच्या बेगुसरायमध्ये कन्हैयाकुमार पराभवाच्या वाटेवर, गिरीराज सिंह आघाडीवर
बिहारच्या बेगुसरायमधील लढत ही लक्षवेधी आहे. या मतदारसंघात जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि भाकपाचा उमेदवार कन्हैयाकुमार आणि भाजपाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आणि काँग्रेस- राजद महाआघाडीचे उमेदवार तन्वीर हसन यांच्यात लढत आहे. या मतदारसंघात भाजपाचे गिरीराज सिंह हे ८९ हजार मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात भूमीहार, मुस्लीम, यादव आणि कुर्मी मतदार आहेत. गिरीराज सिंह आणि कन्हैयाकुमार हे भूमीहार समाजाचे आहेत. तन्वीर हसन आणि कन्हैयाकुमार यांच्यात मुस्लीम मतांचे विभाजन झाल्याने याचा फायदा भाजपाला झाल्याचे दिसते.