किशोर शिंदे यांना चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजपात येण्याची ऑफर

Update: 2019-10-21 13:53 GMT

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आज पार पडली. संध्याकाळी मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व पक्षांचा विरोध मावळतो. नेते आणि कार्यकर्तेही एकमेकांच्या भेटीगाठी घेतात. अशीच एक भेट घडली ती यंदाच्या निवडणूकीचे विशेष आकर्षण ठरलेल्या कोथरुड मतदारसंघातील प्रतीस्पर्धी भाजपचे चंद्रकांत पाटील आणि किशोर शिंदे यांची.

या भेटीत चंद्रकांत पाटील यांनी किशोर शिंदेंना चक्क भाजपात येण्याची ऑफर दिली आहे. यावर शिंदेनी तुमच्या पक्षात बरीच कर्तृत्वान मंडळी असुन, पुढे आमच्याशी युती केली तर बघुया असं म्हणत हशा पिकवला..

https://youtu.be/sDI1VKL0ZHg

Similar News