पुण्यातल्या पुराबाबत मुख्यमंत्र्यांचं शरद पवार यांना रिपोर्टींग

Update: 2019-09-26 09:26 GMT

पुण्यात आलेल्या पुराने पुणेकरांचं जनजीवन विस्कळीत झालं असून पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नं सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली आहे.

रात्री आलेल्या पुराने पुणे शहरात हाहाकार माजला होता. काल रात्री पावसाला सुरवात झाली आणि रात्री उशिरा पावसाने जोर धरला. अऩेक भागात नदीचं स्वरूप आलं होत. अरण्येश्वर भागात काही जण पुरात वाहूनही गेले. पुण्यातल्या पुराबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांना परिस्थितीची माहिती दिली आपण स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेऊन होतो, लोकांना मदत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे.

शरद पवार यांच्या बरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनाही परिस्थितीवर नियंत्रण आणले जात असल्याचे सांगितले.

Similar News