विधानपरिषद निवडणूक: सतीश चव्हाणांची हॅट्रट्रिक,भाजप उमेदवाराला पदवीधरांकानी नाकारलं

Update: 2020-12-04 04:15 GMT

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीची अंतिम आकडेवारी घोषित करण्यात आली असून, या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅट्रीक पूर्ण केली.तर त्यांच्या विरोधात टक्कर देणारे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तर आपल्या विजयात महाविकास आघाडीचा मोठा वाटा असून, तिन्ही पक्ष एकत्र आल्याने फायदा झाला आणि मताधिक्य वाढलं अस मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण व्यक्त केलं.

पहिल्या फेरी पासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. सतीश चव्हाण यांना एकूण ११६६३८ मते मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना ५८७४३  मते मिळाली. पाचव्या फेरी अखेर सतीश चव्हाण ५७८९५ मते  विजयी घोषित करण्यात आले.

तब्बल २३ हजार मत बाद गेल्यावेळीच्या निवडणुकीत मोठ्याप्रमाणात मत बाद झाली होती. तर यावेळी पुन्हा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदार जनजागृती अभियान राबवूनही २०१४ च्या निवडणुकीच्या मानाने दुप्पट मत बाद झाली. यावेळी २३०९२ मत बाद झाली. चुकीच्या पद्धतीने मत नोंदवणे, खाडाखोड करणे यामुळे मत बाद झाली. तर याचप्रमाणे अनेकांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करत मत पत्रिकेवर तसा उल्लेख केल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात 

Tags:    

Similar News