भारताच्या इतिहासात चार कामगार कायद्यातील बदल हा कामगारांच्या हक्कांवरील अत्यंत गंभीर हल्ला आहे. कामगारांनी संघर्षातून आजतागायत मिळवलेले हक्क आणि त्यासंबंधीचे कायदे मोदी सरकारने रद्दबातल केले आहेत. चार लेबर कोडस म्हणजे दुसरे तिसरे काही नसून केवळ कॉर्पोरेट मालकांचे हात बळकट करण्यासाठीचा डाव आहे. कामगारांचे दमन करून त्यांना नव्याने गुलामगिरीत ढकलण्यासाठी मालक आणि राज्यकर्ते सरकार यांनी संगनमताने रचलेले कुटील कारस्थान आहे. हे लेबर कोड्स म्हणजे कामगार वर्गावरील थेट राजकीय हल्ला आहे, त्यामुळे 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. केंद्रातील भाजपच्या कामगारविरोधी धोरणाचा समाचार घेतला आहे बँकिंग तज्ञ विश्वास उटगी यांनी