शेतकऱ्यांसाठी कौन्सलिंग सेंटर हवीत यशोमती ठाकूर यांची मागणी

Update: 2022-12-28 07:36 GMT

राज्यात पाऊस ,अतिवृष्टी ,दुष्काळ यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होते.त्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल होतात.नैराश्यातून आत्महत्या करतात .हिवाळी अधिवेशनात विधानसभेत यावर अनेक चर्चा झाल्या आहेत.राज्यात 10000 वेदर स्टेशन बसवण्याची माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची मागणी मान्य झाली आहे.

याबरोबरच यशोमती ठाकूर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठीच्या विधवा महिला त्याचप्रमाणे शेतकरी यांसाठी कौन्सलिंग सेंटर उघडण्याची मागणी केली आहे .

"शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल आपण बोलत असतो .हा विषय गंभीर आहे .आपल्याला सर्दी खोकला झाला तर औषध घेऊ शकतो.पण शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणींमुळे शेतकरी निराश होतो .त्याला मदत हवी असेल तर तो कोणाशी बोलणार? त्यासाठी कोन्सलिंग सेंटर कुठेच नाहीयत .शेतकरी धास्ती घेतो .त्याला जर मदत हवी असेल तर त्याने कुठे जायचे ?

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकरी महिला ज्या विधवा आहेत त्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी अशी सेंटर सुरू करणार का?" असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला .

यावर "आत्महत्याग्रस्त विधवा शेतकरी महिलांसाठी धोरण निश्चित केल जाईल,निश्चितच शेतकऱ्यांसाठी हा चांगला निर्णय असेल,यापद्धतीने कौन्सलिंग सेंटर सूरु करण्यासाठी समिती गठीत करू ज्यामध्ये यशोमती ठाकूर सुद्धा असतील आणि योग्य निर्णय घेऊ "अशाप्रकारे उत्तर शंभुराजे देसाई यांनी दिलं आहे.

Tags:    

Similar News