Rajyasabha Election : संभाजीराजे शिवसेनेत जाणार?

Update: 2022-05-23 11:31 GMT

राज्यसभेची दुसरी टर्म मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संभाजीराजे यांची शिवसेनेनं कोंडी केली आहे. सहाव्या जागेवर दावा करत शिवसेनेनं इथे आपलाच उमेदवार उभा करण्याची भूमिका घेतली आहे. तसेच संभाजी राजे यांनी शिवसेनेत यावे अशी ऑफर दिली आहे. पण या अटीमुळे संभाजीराजे नाराज असून त्यांनी शिवसेनेचा प्रस्ताव नाकारल्याची चर्चा आहे. पण शिवसेना आपलाच उमेदवार देण्यावर ठाम असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. शिवसेनेचे सत्तेमधील सहकारी पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही ही जागा शिवसेनेची असल्याने शिवसेना देईल त्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. खुद्द् शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही हीच भूमिका मांडली आहे.

एकीकडे ही रस्सीखेच सुरू असताना अटीशर्तीचे राजकारण करु नका, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने महाविकास आघाडीला केले आहे. दुसरीकडे संभाजीराजेंना पहिल्यांदा खासदार बनवणाऱ्या भाजपने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.

हे सगळे वातावरण तापले असताना आता ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी शिवसेनेनं आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. शिवसेनेच्या ऑफरवर संभाजीराजे यांनी स्वत: अजून कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. पण शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय संभाजीराजेंना महाविकास आघाडीची मतं मिळणार नाहीयेत, त्यामुळे संभाजीराजे काय भूमिका घेतात आणि भाजप संभाजीराजेंच्या या कोंडीचा फायदा करुन घेणार की वेगळा उमेदवार देणार याबाबत उत्सुकता आहे.

Full View

Tags:    

Similar News