खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच: बंडखोर आमदार चंद्रकांत पाटील यांच वक्तव्य

Update: 2022-07-07 10:38 GMT

खरी शिवसेना कोणाची यावर ठाकरे-शिंदे गटाचा वाद सुरू असतांना मुक्ताईनगर चे शिवसेनेचे शिंदे गटातील बंडखोर आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना ही आमचीच अस सांगून, शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच, बाळासाहेबांचीच आहे. आम्ही शिवसेनेपासून वेगळे झालं नसून शिवसेनेतच आहे , राहिला प्रश्न धनुष्यबानाचा तो वरिष्ठ पातळीवर जो निर्णय मान्य होईल तो आम्ही मान्य करू अस मुक्ताईनगर येथ पत्रकार परिषदेत सांगितलं , दरम्यान शिंदे गटातीलच गुलाबराव पाटील ह्यांनी कालच दावा केला होता की विधांमंडळात बहुमत असल्याने खरी शिवसेना आमचीच आहे धनुष्यबाण चिन्हासाठी पुढील लढाई न्यायालयात असेल असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलीय, शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे गटांन खऱ्या शिवसेनेवरून आपापले दावे करत असतांना बंडखोर आमदार चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंची शिवसेना असं वक्तव्य केल्याने शिंदे गटात एकवाक्यता नसल्याने नवा वाद ओढवून घेतला आहे.

Full View
Tags:    

Similar News