विधान परिषद पोटनिवडणूक २९ नोव्हेंबरला

Update: 2021-11-01 03:19 GMT

काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी २९ नोव्हेंबरला पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी ९ ते १६ नोव्हेंबर या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून, २२ तारखेपर्यंत माघार घेता येईल. खुल्या पद्धतीने मतदान असल्याने राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती. विधान परिषदेकरिता गुप्त मतदान पद्धतीची कायद्यात तरतूद आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे पावसाळी अधिवेशनात टाळण्यात आले होते. यावर मार्ग म्हणून विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रि येत बदल करून गुप्तऐवजी आवाजी मतदानाने निवड करण्याची नियमात सुधारणा करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

महाविकास आघाडीला १७० आमदारांचा पाठिंबा आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६९ मते आघाडीला मिळाली होती. राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून काँग्रेस नेत्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी लागली होती.

काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक जुलै २०२४ पर्यंत आमदारकीची मुदत असल्याने काँग्रेस पक्षात या जागेसाठी अनेक जण दावेदार आहेत. रणपिसे हे दलित समाजातील नेते होते. यामुळेच पक्षाने दलित समाजातील नेत्यालाच उमेदवारी द्यावी, अशीही मागणी होत आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसने मराठवाडय़ातीलच रजनी पाटील यांना संधी दिली. यामुळे रणपिसे यांच्या पुण्यातील एखाद्या नेत्याला आमदारकी द्यावी, अशीही मागणी के ली जात आहे.

Tags:    

Similar News