(Delhi MCD) दिल्ली महानगर पालिकेत अभुतपूर्व गोंधळ , 'आप' ला कशाची वाटते भीती ?

Update: 2023-01-06 09:25 GMT

 दिल्ली महापालिकेची निवडणूक सध्या चर्चेत आहे ती महापौरपदासाठीच्या निवडणुकीवेळी झालेल्या गोंधळामुळे. अर्थात संख्याबळाचा विचार केला तर आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party – AAP) ने घवघवीत यश मिळवले आहे. मात्र, नगरसेवकांच्या शपथविधीच्या वेळी अक्षरशः सभागृहात लाथा-बुक्क्यांचे दर्शन झाले.

काही दिवसापूर्वी दिल्ली महानगर पालिकेच्या (Delhi MCD) निवडणुका पार पडल्या. आज दिल्ली महानगर पालिकेत महापौरपदासाठी (MCD Mayor) निवडणुक होत आहे. त्याचबरोबर उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांची देखील निवड होणार आहे. या निवडीपूर्वी दिल्ली महानगर पालिकेत अभुतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. निवडणुकीपूर्वी नगरसेवकांना शपथ दिली जाते. या शपथविधीपूर्वीच आप च्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घातला. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे (BJP) नगरसेवक सत्य शर्मा यांची उपराज्यपालांनी पीठासीन अधिकारी म्हणून नेमणुक केली. शर्मा यांच्या नेमणूकीवर आप च्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. यादरम्यान नगरसेवकांमध्येच धक्काबुक्कीही झाली.


यापूर्वी चंदीगड महानगर पालिकेत भाजपाची सदस्य संख्या कमी असताना देखील भाजपाचा महापौर झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती दिल्ली महानगर पालिकेत होऊ नये म्हणुन आप ने खबरदारी घेतली आहे. दिल्लीत भाजपाच्या नेत्याने चंदीगडची पुनरावृत्ती करु असा इशारा दिला होता. या गोंधाळाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर वायरल होत आहे.

Tags:    

Similar News