आपल्याला शत्रू संपवायचा आहे, उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना थेट इशारा

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापन दिन साजरे करण्यात आले. यावेळी षण्मुखानंद सभागृहात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना थेट इशाराच दिला आहे.

Update: 2023-06-19 17:50 GMT

शिवसेनेच्या 57 वर्षांच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे करण्यात आले. त्यामध्ये ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा षण्मुखानंद सभागृहात तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गोरेगाव येथील नेस्को पार्क येथे वर्धापन दिन साजरा झाला. यावेळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. मात्र षण्मुखानंद सभागृहात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपल्याला शत्रू संपवायचा आहे, असं म्हणत थेट इशाराच दिला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Speech) म्हणाले, हे आल्यापासून पाऊस सुद्धा लांबला आहे. परंतु पाऊस पडू दे बळीराजाला त्याच फळ मिळू दे. हे सत्तेत आल्यापासून जाहिरातींवर जेवढा खर्च झालेला आहे, तेवढा खर्च शेतकऱ्यांना दिला असता तरी आपल्या बळीराजाचं संकट दूर झाल असत. मी कधी हिम्मत हरलो नाहीच आणि हरणार पण नाही. मला नेहमी असं वाटतं की शिवसेना प्रमुख आपल्याकडे बघत आहेत. आपली परीक्षा घेत आहेत. अतिरेक्यांचे संकट असो की धमक्या असो, हे सर्व मी सोसलं आणि ही सर्व फौज उभी केली. जिकडे आव्हान आहे तिथे शिवसेना, जिथे शिवसेना आहे तिथे आव्हान हे असंलच पाहिजे. नोकिया मोबाइल मधल्या स्नेकच्या खेळाप्रमाणे आपल्याला आव्हान पेलत जायचं आहे. परंतु हे आव्हान आपल्याला संपवायचे आहे आणि हे शेवटचं असणार आहे. आपल्याला हा शत्रू संपवायचा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला. 

Full View



Tags:    

Similar News