पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊतांचे ट्विट... उदय सामंतांचे स्पष्टीकरण...

Update: 2023-02-11 13:37 GMT

राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांचा मृत्यू झाला किंवा त्यांना ठार मारण्यात आले. हा प्रश्न उपस्थित करुन खासदार संजय राऊत यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. संजय राऊत यांनी एक ट्विट करत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत खुनी पंढरीनाथ आंबेरकर यांचा फोटो आहे. नेमके हे काय प्रकरण आहे जाणून घेवूया...

व्यक्ती को कुचल देनेसे विचार नही मरता. अशा आशयाचे ट्विट करुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. काही दिवसांपूर्वी राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या झाल्याचा दावा अनेकजणांनी केला आहे. ठाकरे गटाचे नेते तखा खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आमि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पत्रही लिहिले आहे. मात्र या पत्रानंतर आता राऊत यांनी एक ट्विट करुन त्यासोबत एक फोटो सुद्धा जोडला आहे. या फोटोमध्ये आरोपी असलेला पंढरीनाथ आंबेरकर यांचा फोटो राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत आहे. याचे उत्तर सामंत यांना द्यावेच लागेल असा सवाल केला आहे. मात्र यावर पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊतांचे ट्विट...उदय सामंतांचे स्पष्टीकरण... यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी जो फोटो ट्विट केला आहे तो फार जुना असल्याचे उद्य सामंत यांनी सांगितले आहे. तसेच हा फोटो नाकारण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सुद्धा सामंत यांनी स्पष्ट केले आहे. कारण मी मंत्री झाल्यानंतर प्रथम रत्नागिरीला गेलो होतो त्यावेळी अनेकजणांनी माझ्यासोबत फोटो काढले. तसाच हा सुद्धा एक फोटो आहे. तो फोटो काढला म्हणजे मी त्याला पाठबळ दिले असा अर्थ होत नाही. कारण या व्यक्तीचे राज्यातील अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत. आणि ते राज्यातील जनतेने सुद्धा पाहिलेले आहेत. या फोटोमध्ये जो नेता आहे तो या पत्रकाराच्या खुनामध्ये सहभागी असल्याचे, राऊत यांनी सांगण्याचा आपल्या ट्विटमधून प्रयत्न केला आहे. मात्र असे घाणारडे राजकारण करणे योग्य नसल्याची प्रतिक्रीया उदय सामंत यांनी दिली आहे.


“संजय राऊत यांनी पत्रकाराच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. या मागणीचे मी पूर्ण समर्थन करतो. माझी, माझ्या नातेवाईकांची त्या ठिकाणी एक इंचही जमीन असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे. मात्र जमीन नसेल तर ज्यांनी तसे आरोप केले आहेत, त्यांनी राजकारण सोडायला हवे,” असे आव्हानही उदय सामंत यांनी केले.

संजय राऊत यांनी ट्विटरवर उदय सामंत यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोचा संबंध त्यांनी शशिकांत वारिशे मृत्यू प्रकरणाशी जोडला आहे. ट्वीटमध्ये संजय राऊत “व्यक्ती को कुचल देनेसे विचार नही मरता. पत्रकार शशिकांत वारिशे यांचा खून राजकीय आहे. नाणार परिसरात नेत्यांनी मोठ्या प्रमाणात बेनामी जमीन खरेदी केली आहे. त्या सर्व सावकार आणि जमीनदारांनी मिळून शशिकांत यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली. शशिकांतचा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर?” असे संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

Tags:    

Similar News