अनिल परब यांचा किरीट सोम्मयांविरोधात १०० कोटीचा दावा

Update: 2021-09-21 12:36 GMT

रत्नागिरी जिल्ह्यातील कथित अनधिकृत बांधकाम प्रकरणी ट्विटरवरुन बदनामी केल्याबद्दल महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपनेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

जून २०२१ मधे किरीट सोमय्या यांनी रत्नागिरी जिल्हयातील अनधिकृत बांधकामाबद्दल अनिल परब यांच्यावर टि्विट करुन आरोप केले होते. या बांधकामाशी मंत्री परब यांचा कोणताही संबध नाही. कुठल्याही संस्थेने या प्रकरणी त्यांना नोटीस दिलेली नाही. किरीट सोमय्या यांच्या टि्वटनंतर सर्व प्रकारणच्या मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधे यासंबधीची वृत्तं छापून आली. त्यामुळे पत्रकार, सहकारी, सरकार आणि पक्षामधे नाहक बदनामी झाल्याचे परब यांनी याचिकेत म्हटलं आहे.

एवढी बदनामी करुन सोमय्या थांबले नाही तर त्यांनी परब यांच्यावर खंडणीचा आरोप करुन तरुंगात डांबण्याची धमकी दिली होती.याबाबत अनिल परब यांनी कायदेशीर नोटीस पाठवून टि्विट डिलीट करण्याची मागणी केली होती. परंतू सोमय्यांनी या नोटीसला साधे उत्तरही दिले नाही असं परब यांनी याचिकेत म्हटलं आहे.

१०० कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याबरोबरच बिनशर्त माफी आणि प्रमुख भाषिक- इंग्रजी वृत्तपत्रात माफीनामा प्रसिध्द करण्याची मागणी हायकोर्टात केली आहे. त्याशिवाय किरीट सोमय्यांना कायमस्वरुपी बदनामीकारक वक्तव्य आणि आरोप करण्यावर हायकोर्टानं बंदी घालावी अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.

Tags:    

Similar News