राज्य सरकारने पुरग्रस्तांसाठी निकषांच्या बाहेर जावून मदत करावी - फडणवीस

Update: 2021-07-28 04:49 GMT

मुसळधार पावसामुळे राज्यातील जवळपास नऊ जिल्ह्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्त हानी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे कोकणाला सर्वाधिक फटका बसलाय. पुरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी पुरग्रस्त भागाचा दौरा केला. दरम्यान आज राज्याच्या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर हे सातारा जिल्ह्याचा दौरा करत आहेत. आज सकाळी देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर मुंबईहून सातारा कडे रवाना झालेत.

दरम्यान यावेळी माध्यमांशी बोलतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत की, परिस्थिती गंभीर आहे आणि आव्हानं देखील नवीन आहेत. अशावेळी लोकांच्या मनातील भीती दूर करावी लागणार आहे. सरकारने या पुरग्रस्तांचे दैनंदिन जनजीवन सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करायला हव्यात. सरकारने निकषांच्या बाहेर जावून काम करायला हवी. असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलंय.


दरम्यान राजकीय नेत्यांनी पुरग्रस्त भागांचे दौरे करून तिथल्या मदत आणि बचावकार्यात अडथळा आणू नये असं आवाहन कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. मात्र, अजूनही अनेक राजकीय नेते दौरे करत आहेत. पुरग्रस्त भागातील नागरिकांनी राजकीय नेत्यांना केवळ दौरे करू नका भरघोस मदत करा असं म्हटलं आहे.

Tags:    

Similar News